खानापूर
खानापूरमध्ये थरारक बैलगाडा शर्यतीचे आयोजन – मोठा व लहान गटांसाठी भव्य पारितोषिके

खानापूर: तालुका शर्यत कमिटीच्या वतीने मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर आणि 30 ऑक्टोबर रोजी लहान गट व मोठा गटासाठी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीनंतर मोठ्या गटासाठी अनुक्रमे 35,000/-, 30,000/-, 25,000/- आणि 21,000/- अशी 15 पारितोषिके, तसेच लहान गटासाठी अनुक्रमे 15,000/-, 11,000/-, 9,000/- आणि 8,000/- अशी 15 पारितोषिके देण्यात येणार आहेत.
या शर्यतीचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, आणि प्रगतशील शेतकरी शंकर चौगुले यांच्या हस्ते होणार आहे, तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद तालुका शर्यत कमिटीचे अध्यक्ष नारायण कारवेकर भूषवतील. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका शर्यत कमिटीचे उपाध्यक्ष बाबू घार्शी यांनी केले आहे.
