खानापूरमध्ये “आमदार चषक” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, पहिले बक्षीस 1 लाख तर दुसरे पन्नास हजार

खानापूरवार्ता: चव्हाटा युवक मंडळ, निंगापूर गल्ली, खानापूरतर्फे 7 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2025 दरम्यान भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मलप्रभा स्टेडियम, जांबोटी क्रॉस येथे होणार आहे. “आमदार चषक” या नावाने प्रसिद्ध असलेल्या या स्पर्धेने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला रु. 1,00,000/- व ट्रॉफी प्रदान केली जाणार आहे, तर उपविजेत्या संघाला रु. 50,000/- व ट्रॉफी देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक सामन्यातील “मॅन ऑफ द मॅच,” उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि अंतिम सामन्यातील “मॅन ऑफ द सिरीज” असे अनेक सन्मान देखील देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेसाठी काही नियम ठरविण्यात आले आहेत. खानापूर शहरातील संघांना दोन आयकॉन्स, पंचायत स्तरावर तीन आयकॉन्स, तर बेळगाव ग्रामीण स्तरावर एका गावासाठी एक संघ व दोन आयकॉन्स असे नियम आहेत. उत्तर कॅनरा पंचायत स्तरावर दोन आयकॉन्ससह एका संघाला सहभागाची संधी आहे. प्रत्येक खेळाडूसाठी ओळखपत्र अनिवार्य असून संघासाठी ठरावीक ड्रेस बंधनकारक आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संघाला रु. 5000/- प्रवेश फी भरावी लागेल. नोंदणीसाठी अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 निश्चित करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी विनायक चव्हाण (6360687030), सुहास गुळेकर (8792086136 ), सोमनाथ गवडे (8799128001 ), आणि मानशिंग चौगुले (7795240948) यांच्याशी संपर्क साधावा. खानापूरमधील क्रिकेटरसिकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपली चमक दाखवावी अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
