खानापूर

चापगाव येथे नियमबाह्य रेशन वाटप! पंचहमी योजनेच्या अध्यक्षांची अचानक भेट

खानापूर: चापगावमधील राशन दुकानात नियमांच्या विरोधात राशन वाटप होत असल्याचे उघडकीस आले आहे. आज दुपारी 12.30 वाजता पंचहमी योजनेचे अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी आणि रुद्राप्पा पाटील यांनी अचानक भेट देऊन चौकशी केली. चौकशीत आढळले की, शिवोली, वड्डेबैल आणि अल्लेहोळ येथील लाभार्थ्यांना राशन वाटण्यात आले असून, अंत्योदय कार्डधारकांना मिळणाऱ्या 45 किलो तांदळाऐवजी केवळ 35 किलो तांदूळ देण्यात आला आहे.

जनतेची लूट – कारवाईचा इशारा

याचा अर्थ प्रति कुटुंब 10 किलो तांदूळ कमी दिला जात आहे. जर चापगाव पंचायत क्षेत्रातील इतर गावांमध्येही असेच होत असेल, तर संबंधित नागरिकांनी त्वरित सुर्यकांत कुलकर्णी (फोन नं. 8431081313) यांच्याशी संपर्क साधावा.

“सरकार जनतेसाठी मोफत तांदूळ देत आहे, मात्र काही दुकानदार हा तांदूळ स्वतःच्या मालासारखा वाटत आहेत. अशा दुकानदारांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राशन दुकानांना टाळे ठोकले जाईल आणि लायसन्स रद्द केले जाईल,” असा इशारा सुर्यकांत कुलकर्णी यांनी दिला आहे.

बीपीएल कार्डधारकांसाठी महत्त्वाची माहिती

  • मार्च महिन्यासाठी प्रति माणशी १५ किलो तांदूळ दिला जात आहे.
  • एप्रिलपासून प्रति माणशी १० किलो तांदूळ वाटप होणार आहे.
  • जर कोणाला मार्च महिन्याचे पूर्ण राशन मिळाले नसेल, तर तातडीने संपर्क साधावा.

कायदेशीर कारवाईचा इशारा

“गोरगरीब जनतेचा हक्काचा तांदूळ लाटण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. योजनेतील लाभार्थ्यांनी आपले संपूर्ण राशन मिळाले आहे का, याची खात्री करावी आणि अनियमितता आढळल्यास लगेच तक्रार करावी,” असे कुलकर्णी यांनी सांगितले.

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने गोरगरीब जनतेसाठी पंचहमी योजना राबवली आहे. मात्र, काही दुकानदारांनी लाभार्थ्यांच्या तोंडचा घास हिसकावण्याचा प्रयत्न केल्यास कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते