बातम्या

आयटी क्षेत्रात 10 वरून आता 12 तास काम? कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ

बेंगळुरू: आयटी कर्मचाऱ्यांचा कामाचा दिवस 10 वरून 12 तासांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर कर्नाटक सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. राज्याच्या नोकरी आरक्षण विधेयकावर मोठ्या प्रमाणात टीका होत असतानाच हे पाऊल उचलण्यात आले आहे.

कर्नाटक दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीमुळे आयटी क्षेत्रातील संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली असून वाढीव तासांमुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होईल, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे.

कर्नाटक स्टेट आयटी/आयटीईएस एम्प्लॉइज युनियनने (केआयटीयू) या विधेयकाला कडाडून विरोध केला असून या विधेयकामुळे नोकऱ्या जातील आणि आयटी कामगारांमधील आरोग्याच्या समस्या वाढतील, असा दावा केला आहे.

Karnataka Government Planning Proposal To Extend IT Employees’ Working Hours To More Than 12 Hours A Day

it working hours in Bangalore

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते