जम्मू येथे दहशतवादी हल्ला, चार जवान शहीद
जम्मू-काश्मीर: येथील कठुआ जिल्ह्यातील मचेडी भागात सोमवारी भारतीय लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार भारतीय जवान शहीद झाले असून सहा जण जखमी झाले आहेत.
सोमवारी सायंकाळी या हल्ल्याची बातमी समोर आली आहे. दहशतवाद्यांनी लष्कराच्या गाडीला लक्ष्य केले. संध्याकाळी उशिरा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात चार जवान शहीद झाल्याची बातमी मिळाली. या घटनेत सहा जवान जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

हा भाग भारतीय लष्कराच्या 9 कोअरअंतर्गत येतो. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर भारतीय जवानांनीही प्रत्युत्तर दिल्याची माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली.
कठुआ शहरापासून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहाई मल्हारमधील बडनोटा गावात लष्कराची काही वाहने नियमित गस्त घालत असताना ही घटना घडली.
या भागात फौजफाटा रवाना करण्यात आला असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

indian army man death in jammu
attack on indian army