बातम्या

हेगडे व हेब्बार यांच्या अनुपस्थितीमुळे चिंता वाढली, कॉंग्रेस प्रवेशाची चर्चा

खानापूर: उत्तर कन्नड जिल्यातील शिरशी येथे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला स्थानिक बडे नेते गैरहजर होते. मोदी यांच्या मेळाव्याला स्टेजवर विद्यमान खासदार अनंतकुमार हेगडे ( MP Anant Kumar Hegde) आणि भाजपचे आमदार शिवराम हेब्बर( Yellapur MLA Shivaram Hebbar) हे अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाची चर्चा जोरदार सुरु आहे.

यंदा भाजपने विद्यमान खासदार अनंतकुमार हेगडे यांना तिकीट नाकारल्यापासून हेगडे हे नाराज आहेत. कारवार मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्या प्रचाराला येणे त्यांनी टाळले आहे. त्यांना निमंत्रण दिले असले तरी ते किवा त्यांचा एकही कार्यकर्ता संपर्कात नसल्याने त्यांच्या पक्षाशी असलेल्या युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  

दुसरीकडे भाजपचे आमदार शिवराम हेब्बर हे देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चांना उधाण आले आहे. शिवराम हेब्बर यांचे चिरंजीव विवेक हेब्बर यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी देखील शिवराम हेब्बर हे काँग्रेस-जेडीएसच्या युतीतील 17 आमदारांपैकी एक होते, त्यांनी पक्ष सोडला, त्यामुळे जुलै 2019 मध्ये तत्कालीन एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडीएस चे आघाडी सरकार कोसळले. कालच्या नरेंद्र मोदी यांच्या सभेला te उपस्थित राहतील असे सर्वांना वाटत होते पण काल दोघांच्याहि अनुपस्थितीमुळे सध्या सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत, विशेषत: हेब्बार यांचा काँग्रेसकडे पूर्वीचा कल पाहता.

हेगडे व हेब्बार यांचे बॅनरवरील फोटो गायब

सभे आधी व सभेत कोणत्याही बॅनरवर हेगडे यांचे छायाचित्र नसल्याने, हेगडे व हेब्बार या दोघांची अनुपस्थिती यामुळे उत्तर कन्नडमध्ये पक्षाची एकजूट आणि पाठिंब्याबाबत चिंता वाढली आहे.

वैयक्तिक आणि भावनिक आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कर्नाटकातील चारही सभांमध्ये उपस्थितांना आपल्यावर उपकार करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले,  हे माझ्या पक्षाचे काम नाही किंवा निवडणुकीशी संबंधित काम नाही तर माझे वैयक्तिक काम आहे.

“जेव्हा तुम्ही माता, भगिनी आणि माझ्या उमेदवारांना नमस्कार करता तेव्हा ते आशीर्वाद मला मला मिळतात. त्यांच्या आशीर्वादामुळे मी अधिक मजबूत होतो आणि देश आणि जनतेच्या रक्षणासाठी अधिक मेहनत करण्याची अधिक ऊर्जा मिळते” असे मोडी म्हणाले. सायंकाळी होसपेटे  झालेल्या बैठकीत त्यांनी उपस्थितांना मोबाइलवरील फ्लॅश लाईट चालू करण्याचे आव्हाहन केले आणि पाठींबा मागितला.

मोदींसाठी कन्नड अनुवादक नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एकापेक्षा अधिक ठिकाणी प्रचार सभा घेतल्या पण भाषांतरा शिवाय मी फक्त हिंदीत बोलू का, असा प्रश्न विचारला. “मी आज हिंदीत बोलू शकतो का? आज माझ्याकडे अनुवादक नाही कारण मला माहित आहे की तुमच माझ्यावर इतकं प्रेम आहे की तुम्हाला मला समजून घेण्यासाठी शब्दांची गरज नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते