कणकुंबी ,गोव्यात मुसळधार 105 जणांनी वाचवण्यात यश
कणकुंबी: गोवा आणि कणकुंबी भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पावसाने कहर केला आहे.
वाळपाई सत्तरी तालुक्यातील पाली येथील शिवलिंग धबधब्यावर फिरायला आलेल्या 150 पर्यटकांसह स्थानिकांना वाचविण्यात आले.काल रविवार असल्यामुळे धबधब्यावर मौजमजेसाठी आलेल्या पर्यटक व स्थानिक लोकांनी गर्दी केली होती. सकाळपासून पावसाने आक्रमक रूप धारण केले होते. दुपारी 12 पर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस चालू होता. हे पर्यटक नदी ओलांडून धबधब्यावर गेले होते. मात्र अचानक नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे नदीचा प्रवाह गतीने वाढू लागला. त्यामुळे पर्यटकांना नदी ओलांडता येत नसल्यामुळे ते अडकले.
heavy rainfall in Goa valpoi

अग्निशामक दल, वन खात्याचे कर्मचारी, पोलिस व स्थानिकांच्या मदतीने ही बचाव मोहीम राबविण्यात आली. सुमारे 3 तास बचाव कार्य सुरू होते.
खानापूर पारवाड येथे दोन घरे कोसळली
चार दिवसांपासुन सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पारवाड गावातील दोन घरे कोसळून दोन्ही कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली आहे. पारवाड येथील महादेव विष्णू गावडे आणि श्रीकांत महादेव गावडे यांची घरे मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे कोसळली असून या दोन्ही कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
सदर घटनेचे माहिती मिळताच पारवाड ग्राम पंचायतीचे अध्यक्ष भिकाजी गावडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असून दोन्ही कुटुंबांना शासनामार्फत नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. दोन्ही कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्याचे देखील नुकसान झाले असून तलाठी व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती दिलेली आहे. लवकरात लवकर योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी पारवाड ग्रा.पं. अध्यक्ष भिकाजी गावडे यांनी केली आहे.
heavy rainfall in Kankumbi Khanapur
