खानापूर

कणकुंबी येथील आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

खानापूर: शनिवार, दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी, मोफत आरोग्य तपासणी, मार्गदर्शन आणि औषधोपचार शिबिर उत्साहात संपन्न झाले.

सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत सरकारी हॉस्पिटल खानापूर, स. हॉस्पिटल बेळगाव आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कणकुंबी यांच्या नियोजनानुसार ज्येष्ठ नागरिक संघटना, ता. खानापूर यांच्या माध्यमातून कणकुंबी पारवाड आमटे व गोल्याळी ग्रामपंचायत आणि या परीसरातील संघसंस्था, पंचमंडळ, लोकप्रतिनिधी आणि देणगीदार यांच्या सहकारातून हे शिबिर संपन्न झाले.



या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजाराम लक्ष्मण गावडे, कणकुंबी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री व्ही एम बनोशी (तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष), डॉक्टर महेश किडसनवर (आरोग्य अधिकारी), श्री विश्वनाथ डिचोलकर, श्री हनुमान सोसायटी ओलमनी, श्री विलास बेळगावकर (जांबोटी सोसायतीचे अध्यक्ष), डॉक्टर श्री बंडोपंत पाटील (कणकुंबी), स्वागताध्यक्ष व सहकारी श्री अरुण नाईक, श्री कृष्णा गावडे आणि श्री डी एम भोसले (ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष) व्यासपीठावर विराजमान होते.

कार्यक्रमाची सुरुवात कणकुंबी माऊली हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ईश्वस्तवन स्वागत गीत गाण्याने झाली. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री सी एस पवार (जनरल सेक्रेटरी) यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व सत्कार श्री एम जी बेनकटी आणि श्री विठ्ठल वेताळ संघटनेचे संयोजक यांनी केले. व्यासपीठावरील सर्वांना शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एल डी पाटील (ऑर्गनाइज सेक्रेटरी) यांनी केले.

वरील ग्रामपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचाही सत्कार करण्यात आला. 90 वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान असणारे श्री शिवाजी नागेश दळवी व लखन शेठ वाडेकर (कणकुंबी) यांचा जीवन गौरव म्हणून सर्व पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रबोधनात्मक व गौरवपूर्ण मार्गदर्शन डॉक्टर महेश किडसनवर यांनी केले. त्यांनी खानापूर तालुक्यात विविध ठिकाणी झालेली आणि होणारी शिबिरे याबद्दल विशेष माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य सेवा व आयुष्मान भारत अभियानाद्वारे मिळणाऱ्या सुविधांचा लाभ मिळवून देण्याची ग्वाही दिली. श्री विलास बेळगावकर (जांबोटी सोसायतीचे अध्यक्ष) यांनी सांगितले की, “मी सुद्धा ज्येष्ठ नागरिक आहे आणि या तालुक्यासाठी मी सातत्याने सेवा व सहकार देण्यास तयार आहे.” त्यांनी या कार्यक्रमासाठी दुपारचे भोजन पाहुणे व शिबिरार्थी यांच्यासाठी सेवास्वरूप देणगी देऊन सहकार्य केले. श्री विश्वनाथ डिचोलकर (हनुमान सोसायटीचे अध्यक्ष) यांनी कार्यक्रमांमध्ये स्वागत समारंभ व सत्कार समारंभ यासाठी शाल व श्रीफळ देणगी देऊन कार्यक्रमास सहकार्य केले. ज्येष्ठ नागरिक संघटना सतत व जिद्दीने दुर्गम भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत आहे. हे कार्य आमच्या तालुक्यासाठी गौरवपूर्ण आहे,” असे उद्गार श्री व्ही एम बनोशी यांनी काढले.

2018 पासून आजपर्यंत अनेक कार्यक्रम व उपक्रम नियोजित करून ज्येष्ठ नागरिकांच्या प्रगतीसाठी व समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या संघटनेतील सर्व पदाधिकारी आणि सर्व ज्येष्ठ नागरिक आपल्या विभागात कार्यरत आहेत. हे आमच्या तालुक्याचे भाग्य आहे, आणि सर्वांचे सहकार्य मिळत आहे. असेच समाजकार्य सर्व मिळून करूया, आणि सर्वांच्या आरोग्य समस्यांचे निवारण करून संघटितपणे तालुक्याचा विकास करूया, यासाठी प्रयत्न करूया व यशस्वी होऊया, असे मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर बंडोपंत पाटील आणि प्रमुख पाहुण्यांचे विचार प्रबोधन झाले. आभार प्रदर्शन श्री उमाकांत वाघधरे यांनी केले आणि कणकुंबी ग्रामपंचायतीमार्फत समारोप करण्यात आला.

हा कार्यक्रम सफल आणि संपन्न होण्यासाठी ग्रामपंचायत कणकुंबी, पारवाड आमटे आणि गोल्याळी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभासद यांचे महत्त्वाचे योगदान लाभले. ग्रामपंचायत कणकुंबी यांनी या कार्यक्रमाच्या अल्पोपहार व चहापानाची सर्व व्यवस्था स्वखर्चाने केली.

या कार्यक्रमात विशेष तज्ञ डॉक्टर श्री पै आर बी एस के बेळगाव, डॉक्टर प्रदीप (डेंटल स्पेशालिस्ट, नंदगड), डॉक्टर रतन (कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्र) व त्यांच्या सर्व टीमने सेवा बजावली. डोळ्यांचे डॉक्टर श्री भीमगौडा यांनी टीबी तपासणी सेवा दिली, जांबोटी आरोग्य केंद्रातील नर्स यांनी शुगर व बीपी तपासणी केली. ककेरीच्या डॉक्टर व नर्सांनी सामान्य आजार व स्त्रियांचे आजार यांची सेवा बजावली.

या शिबिरात 139 चष्मे मोफत देण्यात आले, 80 पेक्षा अधिक लोकांचे आयुष्मान भारत कार्ड बनवले, 40 पेक्षा अधिक दंत चिकित्सा व उपचार करण्यात आले, 30 पेक्षा अधिक लोकांची टीबी तपासणी करण्यात आली, 200 पेक्षा अधिक लोकांच्या इतर आजारांवर औषधोपचार करण्यात आले, आणि 30 पेक्षा अधिक स्त्रियांची तपासणी करून मार्गदर्शन व औषधोपचार देण्यात आले. एकूण 430 पेक्षा अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या कार्यक्रमासाठी श्री माऊली मंदिर विश्वस्त कमिटीने महत्त्वाचे सहकार्य केले. सभागृह, भोजनगृह आणि पाण्याची व्यवस्था व स्वच्छता याची सेवा बजावली.

या कार्यक्रमात अनेकांनी उपस्थिती, सहकार्य व सहभाग दर्शविला. कणकुंबी पंचमंडळ संघ संस्था, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते, तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या विभागाचे निरीक्षक श्री पांडुरंग डिचोलकर, श्री महादेव साबळे, श्री मल्लू चव्हाण, श्री सावंत सर, श्री जयसिंग पाटील, श्री जिगजीनी, श्री निलजगी, श्री प्रकाश काद्रोरोळी, श्री व्ही एन पाटील, श्री महादेव पाटील, श्री कुट्रेसर, श्री रामा डवरी, श्रीमती संजना कोरवी, श्रीमती सोनाली गावडे, श्रीमती प्रभावती चोर्लेकर, श्री शिवाजी कवळे, श्री एस एच गुरव, श्री संजू चव्हाण, सुनील चिकुळकर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांच्या उदात्त हेतू, परिश्रम, नियोजन आणि संयोजनातून हा कार्यक्रम उस्फूर्तपणे संपन्न झाला. अशी सद्गती वाढो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?