खड्ड्यांमुळे बंद पडलेली बस सेवा पुन्हा सुरु: गावकऱ्यांच्या श्रमदानातून मार्ग मोकळा

खानापूर | पडलवाडी: हलसाल क्रॉस ते पडलवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने गावामध्ये येणारी बस सेवा बंद झाली होती. याचा त्रास गावातील नागरिकांना व विशेषतः शाळकरी मुलांना मोठ्या प्रमाणावर होत होता. प्रवासासाठी पर्यायी मार्ग नसल्याने ग्रामस्थ अडचणीत आले होते.

ही अडचण लक्षात घेऊन गावातील युवक आणि महिलांनी पुढाकार घेतला. त्यांनी श्रमदानातून खड्डे भरून काढले आणि बस पुन्हा गावात पोहोचू लागली. त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या उपक्रमात मारुती कांबळे, विलास देसाई, सुनील देसाई, मयूर देसाई, डॉ. वीरप्पा, यल्लाप्पा करुगुप्पी, नारायण मादार, तानाजी तांबूलाकर, वैशाली तांबूलाकर, नीता चौरी यांचे विशेष सहकार्य लाभले.
गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले असून, प्रशासनानेही या रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी केली आहे.
