खानापूर

हलगा ग्रामपंचायतीतून अंगविकलांग नागरिकांना शिलाई मशीनचे वाटप

हलगा (ता. खानापूर) – हलगा ग्रामपंचायतीच्या वतीने पंचायत हद्दीतील अंगविकलांग नागरिकांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम पंचायतच्या ५ टक्के अनुदान निधीतून राबविण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन हलगा ग्रामपंचायतीचे चेअरमन सुनिल मारुती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रणजित कलप्पा पाटील, पांडुरंग कृष्णाजी पाटील, स्वाती सदानंद पाटील, इंदिराताई मेदार, ग्रामपंचायत पीडीओ निंगाप्पा अक्षी, तसेच कर्मचारी मोहन पाटीलसंजय कुडोळी, ग्रामपंचायत हद्दीतील विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

शिलाई मशीन लाभार्थींची नावे पुढीलप्रमाणे:

  • उमेश तुकाराम केसरेकर (हलगा)
  • शितल शंकर पाटील (हलगा)
  • किशन गावडू पाटील (मेरडा)
  • सौ. धनलक्ष्मी संजय कर्लेकर (करजगी)
  • माया नामदेव पाटील (किरहलशी)
  • सुरेखा पुंडलिक पाटील (किरहलशी)
  • भरमाणी निंगाप्पा गुरव (मेंढेगाळी)
  • रमेश निळकंठ गावडा (हत्तरवाड)
  • आरती गंगाराम हलसकर (हत्तरवाड)
  • संतोष मारुती कोलकार (हत्तरवाड)

या उपक्रमामुळे हलगा, मेरडा, करजगी, किरहलशी, मेंढेगाळी आणि हत्तरवाड या गावांतील अंगविकलांग नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार असून त्यांना स्वावलंबी बनण्यास मदत होणार आहे. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या