खानापूर

रस्त्यावर अपघात झाल्यास, सरकारकडून 1.5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार

नवी दिल्ली: रस्ते अपघातात जखमी झालेल्या नागरिकांसाठी देशभरात कॅशलेस उपचार सुविधा केंद्र सरकारतर्फे राबवली जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना सात दिवसांपर्यंत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत उपचार कॅशलेस पद्धतीने मिळतील. या खर्चाची जबाबदारी सरकार उचलणार आहे. तसेच, ‘हिट अँड रन’ प्रकरणांमध्ये मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबाला 2 लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

ही सुविधा केवळ महामार्गांपुरती मर्यादित नसून कोणत्याही रस्त्यावर अपघात झाल्यास उपलब्ध होणार आहे. छत्तीसगडमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेली ही योजना आता सहा राज्यांमध्ये विस्तारली असून, 2025 च्या मार्चपर्यंत ती देशभरात लागू केली जाईल, असे मंत्री गडकरी यांनी सांगितले.

2024 मध्ये देशभरात रस्ते अपघातांमध्ये 1.5 लाख लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये शाळांच्या आसपास झालेल्या अपघातांमध्ये 10000 मुलांचा समावेश होता.

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?