खेळबातम्या

इशानी ब्रदर्स ( विद्यानगर फुटबॉल क्लब) चा दणदणीत विजय..

खानापूर: सर्वोदय विद्यालयाच्या आवारात युनायटेड क्लबतर्फे आयोजित ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धा शनिवार 19 आणि रविवार 20 ऑक्टोबर 2024 रोजी खानापूर येथे पार पडली. या स्पर्धेत 20 पेक्षा अधिक संघांनी सहभाग नोंदवला.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत खानापूरच्या ईशानी ब्रदर्स (विद्यानगर फुटबॉल क्लब) संघाने रेग फुटबॉल क्लब, बार्बोसा यांना 4-0 अशा मोठ्या फरकाने पराभूत करून विजेतेपद मिळवले.

अंतिम फेरीत विद्यानगर FC च्या अजय कदम याने अप्रतिम खेळ करत हॅट्रिक (3 गोल) साधली, ज्यामुळे त्याला स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. अजय कदम याने यापूर्वीही राष्ट्रीय पातळीवर फुटबॉल खेळून खानापूरचे नाव उज्वल केले आहे. तसेच, स्पर्धेत वेदांत याला सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून निवडण्यात आले, तर प्रणित चीगरे याने सर्वोत्तम रक्षकाचा किताब पटकावला.

जल्लोष 🏆

खानापूर तालुक्यात केवळ क्रिकेटच नाही तर फुटबॉल, कबड्डी, खो-खो यासारखे अनेक खेळ खेळणारे अव्वल खेळाडू आहेत. अशा खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते