खानापूर

दांडेलीतील घरातून 500 रुपयांच्या बनावट नोटांचे 14 कोटी जप्त

दांडेली:; गांधीनगर, येथील एका बंद घरातून ५०० रुपयांच्या तब्बल १४ कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दांडेली पोलीस करत असून, या नोटांचा वापर चलनात करण्यासाठी होणार होता की केवळ चित्रपट वा खेळणी म्हणून, याचा उलगडा तपासाअंती होणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, गांधीनगर परिसरातील नूरजहान झुंजवाडकर यांच्या मालकीचे घर गोव्यातील असद खान नावाच्या व्यक्तीने काही महिन्यांपूर्वी भाड्याने घेतले होते. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून असद खान या घरात दिसत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांनी संशय व्यक्त केला. घराची पाहणी केली असता पाठीमागील दरवाजा उघडा आढळून आला.

ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणल्यानंतर, दांडेली पोलीस घटनास्थळी पोहोचले. तपासात ५०० रुपयांच्या १४ कोटींच्या बनावट नोटा आणि नोटा मोजण्याचे मशिन सापडले. या नोटांवर “Reserve Bank of India” ऐवजी “Reverse Bank of India” असे छापण्यात आले आहे. तसेच, नोटांवर गव्हर्नरची सही नाही, सर्व नोटांना ‘शून्य’ क्रमांक देण्यात आले आहेत आणि “Movie Shooting Purpose Only” असा उल्लेख आहे.

सर्व नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून, असद खान याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपशील पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे.


Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते