खानापूर

खानापूर इनरव्हील क्लब च्या वतीने… दहीहंडी

खानापूर: येथील इनरव्हील क्लब च्या वतीने श्री स्वामी विवेकानंद शाळेत दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका श्रद्धा पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. इन्नरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्राचार्या शरयू कदम  यांनी आपल्या मनोगतातून भगवान श्रीकृष्णाच्या जीवनात घडलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा केला.त्यातून बोध घेऊन प्रत्येक संकटावर मात करून जीवन आनंदी बनवायला हवं असं प्रतिपादन केलं.क्लब च्या वतीने फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली आणि विजेत्या स्पर्धेकांना बक्षिसे देण्यात आली.

शाळेतील चिमुकली मूलं राधा कृष्ण , गौळणी, गोपाळ यांच्या वेषभूषेत आली होती..शाळेत गोकुळ अवतरल्याच वातावरण निर्माण झालं होतं..हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबचे सर्व पदाधिकारी, शाळेतील शिक्षकवर्ग परिश्रम घेतले.पालकवर्ग ही उपस्थित होते.

Inner wheel club of khanapurKhanapur.

Khanapur Innerwheel Club

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते