खानापूर

28 ते 30 नोव्हेंबर सिंगिनकोप येथे भव्य बैलगाडा शर्यत; शर्यतप्रेमींमध्ये उत्साह

सिंगिनकोप: श्री कलमेश्वर शर्यत प्रेमी सिंगिनकोप यांच्या वतीने 28 ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीत लहान व मोठ्या गटांमध्ये विविध बक्षिसे ठेवण्यात आली असून, बैलगाडा मालक आणि शर्यतप्रेमींसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.

शर्यतीमध्ये सहभागी गटांसाठी आकर्षक रोख बक्षिशे ठेवण्यात आली आहेत. लहान गटात प्रथम क्रमांकासाठी ₹21,000 आणि 17 वे बक्षिस 2400  1 ते 17 अशी आणि मोठ्या गटात प्रथम क्रमांकासाठी ₹41,000 आणि 17 वे बक्षिस 4200 पर्यंत अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय 17 विविध बक्षिसे आणि लकी ड्रॉ देखील ठेवण्यात आली आहेत.

बैलगाडा शर्यतीचा थरार आणि परंपरेचा वारसा अनुभवण्यासाठी बैलगाडा मालकांनी तसेच शर्यतप्रेमींनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
7026151640 / 7026757400

कार्यक्रमाची तारीख: 28 ते 30 नोव्हेंबर 2024
स्थळ: सिंगिनकोप

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते