गृहलक्ष्मीच्या पैशातून आईकडून मुलाला बाईक

बेळगाव : राज्यातील काँग्रेस सरकारच्या योजनांपैकी एक असलेली गृहलक्ष्मी हमी योजना आता राज्यातील महिलांसाठी आशेचा किरण बनली आहे. अनेक दशकांपासून पाहिलेली लहान लहान स्वप्ने या योजनेच्या माध्यमातून साकार होताना दिसत आहेत. गोकाक तालुक्यातील कौजलगी गावात राहणाऱ्या बागवा नीलप्पा सन्नाक्की या महिलेने राज्य सरकारच्या ‘गृहलक्ष्मी’ योजनेतून आपला मुलगा रमेश नीलप्पा सन्नाक्की यांच्यासाठी दुचाकी खरेदी करण्यासाठी पैसे गोळा केले आहेत. शुक्रवारी तिने दुचाकी खरेदीसाठी डाऊन पेमेंट (आगाऊ रक्कम) साठी मुलाला ही रक्कम दिली.

‘गृहलक्ष्मी’ योजनेतील पैशांमुळे आज लाखो महिलांच्या जीवनात आनंद आला असून त्यांना उदरनिर्वाह करण्यास मदत झाली आहे. त्यानुसार एका आईने आपल्या मुलाला दुचाकी घेण्यसाठी मदत केली. हे ऐकून मला आनंद झाला ‘मी आई-मुलाच्या जोडीला शुभेच्छा देते. असे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.
gruhlaxmi payment
