बेळगाव

घरासमोरील दुचाकी अज्ञातांनी पेटवल्या

बेळगाव: तालुक्यातील आंबेडकर नगर धामणे या भागात सुनील अर्जुन बस्तवाडकर यांच्या घरासमोर लावण्यात आलेल्या दोन दुचाकींना अज्ञातांनी आग लावून पोबारा केल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, आंबेडकर नगर धामणे येथील सुनील बस्तवाडकर यांच्या घरासमोर पार्क करण्यात आलेल्या दुचाकींना गुरुवारी रात्री काही अज्ञातांनी आग लावली.

1 ऍक्टिवा आणि एक स्प्लेंडर अशा दोन दुचाकी आगीत जळून खाक झाल्या असून रात्री 1 च्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकार सकाळी निदर्शनात आल्यानंतर गावपरिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकी पेटवून दिल्यानंतर अज्ञातांनी पोबारा केला असून या भागात सातत्याने असे प्रकार घडू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील दीड वर्षांपूर्वी कुरबरहट्टी या भागात देखील २ वाहने पेटवून देण्यात आली होती. याचप्रमाणे गावच्या सीमेवरदेखील एका दुचाकीला आग लावल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

दुचाकींसह शेतशिवारातील गवतगंजी पेटवून देण्याचे प्रकारही सर्रास सुरु असून या मागे नेमका कुणाचा हात आहे? अशा गोष्टी जाणीवपूर्वक घडवून समाजात तेढ निर्माण करण्याचा, शांतता बिघडविण्याचा कुणाचा मानस आहे का? हे पडताळून पाहण्यासाठी पोलीस विभागाने तपास हाती घेऊन या भागात गस्त वाढवावा अशी मागणी होत आहे.

धामणे गावात वरचेवर होणारे असे प्रकार कधी कमी होणार असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

bike fire in Belgaum , dhamne bike fire

belgavi news, bike fire incident in dhamne

source: belgaum live

Belgaum news

khanapur news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते