परीक्षा शांततेत पार पडणार; विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पेपर सोडवावा
कर्नाटक राज्यात दहावी बोर्ड परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे. परीक्षेसाठी बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना
“खानापूरवार्ता वेबपोर्टल तर्फे” मनःपूर्वक शुभेच्छा💐 !
बेळगाव: प्रत्येक वर्षी दहावी परीक्षा म्हटले की, पहिल्यांदाच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात काहीशी भीती आणि तणाव असतो. काही विद्यार्थी तर आधीच काळजीत पडतात. मात्र, यंदा विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक वातावरण असेल, असे जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी आपल्या शुभेच्छापत्रात स्पष्ट केले आहे.
सीईओ राहुल शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी पाठवलेल्या शुभेच्छा पत्रात म्हटले आहे की, “विद्यार्थ्यांनी धाडसाने परीक्षेला सामोरे जावे. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा सोपीच असते. त्यामुळे तणाव घेऊ नका. प्रश्नपत्रिका मिळाल्यावर ती शांतपणे वाचा आणि प्रथम सोपे वाटणारे प्रश्न सोडवा. त्यानंतर इतर प्रश्नांची उत्तरे आत्मविश्वासाने लिहा.”
शिंदे यांनी असेही सांगितले की, “विद्यार्थ्यांनी परीक्षेचा आनंद घ्यावा आणि भीती बाजूला ठेवावी. उज्ज्वल भविष्यासाठी दहावी परीक्षा ही पहिली पायरी आहे. शिक्षण खात्याने अलीकडच्या काळात परीक्षेसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हसत-खेळत ही परीक्षा द्यावी आणि यशस्वी व्हावे.”

यंदाची परीक्षा शांततेत पार पडेल, यासाठी सर्व स्तरावर तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी निर्धास्त राहून आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून परीक्षेला सामोरे जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
karnataka SSLC exam best wishes
exam best wishes status in Marathi