खानापूर

अनमोड-हेम्माडगा रस्त्यावर मेडा नदीवरील संरक्षण भिंत कोसळली; वाहतूक धोक्यात

जोयडा तालुका प्रतिनिधी |
जोयडा तालुक्यातील अनमोड-हेम्माडगा मार्गावरील मेडा नदीजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतीच बांधलेली संरक्षण भिंत शनिवारी दुपारी पावसामुळे कोसळली. त्यामुळे अनमोड-हेम्माडगा आणि खानापूरकडे जाणारी वाहतूक पूर्णतः धोकादायक बनली आहे.

ही भिंत चालू जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच बांधण्यात आली होती. मात्र, अवघ्या दोन आठवड्यांतच तिचा ढासळलेला अवस्थेत कोसळणे म्हणजे निकृष्ट दर्जाच्या आणि अवैज्ञानिक पद्धतीने झालेल्या कामाचे उत्तम उदाहरण ठरते.

अनमोड घाटमार्गे गोव्याकडून बेळगावकडे येणाऱ्या वाहनधारकांसाठी अनमोड-हेमडगा रस्ता हा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र नदीवरील ही भिंत कोसळल्यामुळे रस्ताही कमकुवत बनला आहे. मुसळधार पावसात हा रस्ता पूर्णतः खचण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सदर संरक्षण भिंतीसाठी मागील चार वर्षांपासून मागणी सुरू होती. अखेर गेल्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात यासाठी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. मात्र कामाची वेळ न चुकता, पावसाळ्याच्या तोंडावर म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे काम उरकण्यात आले.

आज भिंत कोसळल्यामुळे या मार्गावरील प्रवासी आणि स्थानिक नागरिक पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. याचा फटका जोडा तालुक्यातील अखिती पंचायत क्षेत्रातील गावांनाही बसणार आहे.

स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागावर निकृष्ट दर्जाच्या कामाची जबाबदारी टाकत त्वरीत दुरुस्ती आणि कायमस्वरूपी मजबूत भिंत बांधण्याची मागणी केली आहे. अन्यथा संभाव्य दुर्घटनांसाठी प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या