कर्नाटकातील सरकारी कर्मचाऱ्यांना 1 ऑगस्टपासून पगार वाढ: सातवे वेतन लागू
7th Pay Commissio: कर्नाटक सरकार कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीची आनंदाची बातमी घेऊन आला आहे. मात्र यामुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी १७,४४०.१५ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
कर्नाटक मंत्रिमंडळाने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी १ ऑगस्टपासून लागू करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात २७.५ टक्के वाढ होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्य सरकारच्या १२ लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. माजी मुख्य सचिव के. सुधाकर राव यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर २०२२ मध्ये वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती.
वेतनवाढ न केल्यास ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने दिला होता. तेव्हापासून सिद्धरामय्या सरकारवर पगारवाढीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी दबाव होता. अशा तऱ्हेने सरकारने आता वेतनवाढीचा निर्णय घेतला आहे.
Karnataka govt employees to get salary hike from August 1: Seventh pay hike to be implemented