खानापूर

2 बालकांचे अपहरण करण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून गोळीबार

बेळगाव: अथणी शहरातील हुलगबाळ रोडवरील स्वामी प्लॉट येथे तीन जणांच्या टोळीकडून दोन लहान मुलांचे अपहरण झाल्याची घटना गुरुवारी घडली. पोलिसांनी तत्काळ आरोपींचा पाठलाग सुरू केला, मात्र आरोपींनी प्रतिकार करताच पोलिसांनी आत्मसुरक्षेसाठी गोळीबार केला. या गोळीबारात एक आरोपी जखमी झाला असून त्याला अथणीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेच्या दिवशी दुपारी तीन जण कारमधून स्वामी प्लॉट परिसरात आले होते. त्यांनी रस्त्यावर कार उभी करून परिसरातील एका घरात टेहळणी केली. घरात कोणी नसल्याचे पाहून त्यांनी दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना कारमध्ये बसवले आणि पलायन सुरू केले.

नागरिकांनी ही घटना पाहताच पोलिसांना माहिती दिली. लगेचच पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला, परंतु अपहरणकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करत एकजणाला जखमी करून ताब्यात घेतले. पोलिसांनी मुलांची सुटका केली असून या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी घटनास्थळी भेट दिली व पुढील तपास सुरू आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते