खानापूर

हलशी-बेकवाड रस्त्यावर मध्यरात्री गोळीबार: युवकाचा जागीच मृत्यू

खानापूर तालुक्यातील हलशी-बेकवाड रस्त्यावर रात्री तीन वाजण्याच्या सुमारास गोळीबारात एक युवक ठार झाल्याची घटना घडली.  मृत युवकाचे नाव अल्ताफगौस मकानदार (वय 27) आहे. गोळीबार नेमका कोणी आणि कशासाठी केला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हलशी गावातील नरसेवाडी नाल्याजवळ अल्ताफ नियमितपणे वाळू काढायचे काम करत होता. मात्र, रात्री तीनच्या सुमारास झालेल्या गोळीबारानंतर काहींनी ही बातमी तातडीने अल्ताफच्या घरी कळवली. त्यानंतर त्याचा लागलीच मृतदेह घरी नेण्यात आला.

या घटनेबाबत डीएसपी, पोलीस निरीक्षकांसह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली आहे. एक प्रामाणिक युवक असलेल्या अल्ताफवर गोळीबार कशामुळे झाला, याची माहिती मिळालेली नाही. पोलिसांचा तपास स्वानपथकाद्वारे सुरू आहे. रात्री तीनच्या सुमारास झालेल्या या गोळीबारामागे वाळू व्यवसायातील अंतर्गत वाद होता का किंवा शिकारीसाठी गेलेल्यांनी चुकून आवाजाच्या दिशेने गोळीबार केला का, यासंबंधी गावात तर्कवितर्क लावले जात आहेत. अंतिम तपासानंतरच या प्रकरणाचा उलगडा होईल.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते