खानापूर

वनश्री हायस्कूल, हलगा येथे 2008-09 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

खानापूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित वनश्री हायस्कूल, हलगा येथे 2008-09 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल 15 वर्षांनंतर माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र येत त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा मंडळाचे उपाध्यक्ष श्री. विठ्ठल निंगाप्पा गुरव होते. तसेच ग्रामपंचायत अध्यक्ष श्री. महाबळेश्वर परेशराम पाटील, श्री. नानासाहेब पाटील, सौ. रेणुका महादेव पाटील यांच्यासह प्रमुख वक्ते म्हणून श्री. एस. डी. पाटील व प्रमुख अतिथी म्हणून श्री. पी. आर. पाटील, मारुती बडकू पाटील, डी. एम. गुरव, नरसिंग फटाण, वामन सीमांनी सुतार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवन आणि स्वागत नृत्याने करण्यात आली. त्यानंतर नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांची प्रार्थना आणि हजेरी घेत माजी शिक्षकांचा तास पार पडला. दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन निवृत्त मुख्याध्यापक टी. एल. सुतार, मुख्याध्यापिका श्रीमती एस. आर. रोटी, शारीरिक शिक्षक एस. एल. मासेकर, मुख्याध्यापक एस. एन. सपाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

माजी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विशेष सन्मान

या स्नेहमेळाव्यात माजी व विद्यमान शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यासोबतच भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी महाबळेश्वर रामराव पाटील, निखिल मर्याप्पा पठाण, उमेश खांबले, ज्ञानेश्वर नानू पाटील, रामचंद्र कृष्णा पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापक एस. एन. सपाटे सरांनी स्वागत भाषणातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले आणि आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला.

शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान

माजी विद्यार्थी महाबळेश्वर पाटील यांनी शाळेच्या विकासासाठी ५,००० रुपयांची मदत जाहीर केली. तसेच उपस्थित मान्यवरांनीही शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपले सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

प्रमुख वक्ते एस. डी. पाटील सर यांनी माजी विद्यार्थ्यांच्या योगदानावर प्रकाश टाकत शाळेच्या विकासात त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच, आपल्या मराठी शाळा टिकवण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष विठ्ठल निंगाप्पा गुरव यांनी माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत, शाळेबद्दलची आपुलकी अशीच कायम राहावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्नेहभोजनासह स्नेहमेळाव्याची सांगता करण्यात आली.

सूत्रसंचालन: सहशिक्षक ए. जे. सावंत
आभार प्रदर्शन: सहशिक्षिका ए. ए. पाटील

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते