खानापूर

खानापूर-बेळगांव रोडवर अपघात, हलकर्णी येथील तरुण ठार

खानापूर: काल रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी, रात्री 10.30 च्या दरम्यान बेळगाव हून खानापुरकडे येत असताना, मराठा मंडळ डिग्री कॉलेज समोरील बोगद्यात लावलेल्या आडव्या डिव्हायडरवर दुचाकी धडकून हलकर्णी खानापूर येथील युवक निखिल गुंजीकर (वय 22) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

निखिल हा रात्री 10 वाजता बेळगावहून खानापूरकडे येत असताना, रात्री 10.30 च्या सुमारास, डिव्हायडरवर धडकला व तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर बेळगाव येथे उपचार सुरु होते पण उपचारादरम्यान त्याचा काल मध्यरात्री मृत्यू झाला.

निखिल च्या जाण्याने खानापूर व हलकर्णी परिसरात हळहळ व्यक्त हित आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते