खानापूर

पोहायला गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा नदीत बुडून मृत्यू

कोन्नूर– पोहायला गेलेला मुलगा नदीत बुडून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना गोकाक तालुक्यातील कोन्नूर येथे घडली आहे. मनोज लक्ष्मण नायक (वय 15) असे मृत मुलाचे नाव आहे.

कोन्नूर येथील दुपधाळ पुलाखालील घटप्रभा नदीत पाण्याचा प्रवाह अधिक असताना तीन युवक पोहण्यासाठी गेले होते. मात्र, मनोजला पोहायला नीट येत नसल्यामुळे त्याला जोरदार प्रवाहात ओढले गेले आणि तो बुडून मरण पावला. त्याच्यासोबत गेलेले अन्य दोन युवक मात्र सुखरूप परतले.

मृत युवक हा कोन्नूर येथील गोकाक रोड रेल्वे स्थानकाजवळ राहणारा होता. स्थानिक ग्रामस्थ आणि गोकाक अग्निशमन दलाच्या मदतीने बोटीच्या साहाय्याने युवकाचा मृतदेह शोधण्यासाठी शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत गोकाक अग्निशमन दलाचे अधिकारी सदानंद मळवणकर, गोकाक सीपीआय, पीएसआय आणि पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?