खानापूरबातम्या

उत्तर कन्नडमध्ये भाजपचा सातवा विजय; कागेरी निंबाळकरांवर तीन लाखांहून अधिक मतांनी विजयी

Khanapur : उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने सातव्यांदा विजयाची नोंद केली असली तरी यावेळी भाजपने आपला फायरब्रँड उमेदवार अनंतकुमार हेगडे यांना उमेदवारी दिली नाही.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर कन्नड मतदारसंघातून कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी मंत्री विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने बेळगाव जिल्ह्यातील खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना उमेदवारी दिली. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिरसी मतदारसंघातून पराभूत होऊनही कागेरी यांनी डॉ. अंजली निंबाळकर यांचा ३ लाख ३७ हजार ९१९ मतांनी पराभव करून प्रथमच लोकसभेची जागा मिळवली.

या मतदारसंघातून सहा वेळा विजयी झालेले विद्यमान खासदार अनंतकुमार हेगडे कागेरी यांचा प्रचार न करता तटस्थ राहिले. मात्र, त्याचा कागेरी यांच्या विजयावर परिणाम झाला नाही.

भटकळमध्ये डॉ. अंजली निंबाळकर यांना सर्वाधिक 67 हजार 885, येल्लापूरला 64 हजार 66, सिरसीला 60 हजार 124, कित्तूरला 56 हजार 203, हलियालला 54 हजार 546, खानापूरला 48 हजार 148, कारवारला 47 हजार 889 आणि कुमटा ला 44 हजार 439 मते मिळाली.

कारवारमध्ये भाजपचे विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना सर्वाधिक 1 लाख 13 हजार 317, खानापूरला 1 लाख 7 हजार 978, भटकळला 1 लाख 228, सिरसीला 1 लाख ०० हजार 52, कुमटाला 97 हजार 928, कित्तूरला 92 हजार 445 मते, हलियालला 83 हजार 426 मते मिळाली. एकंदरीत कागेरी सर्व मतदारसंघात आघाडीवर राहिले आणि तीन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले.

1999 ची निवडणूक वगळता 1996 च्या निवडणुकीनंतर सलग सातव्यांदा उत्तर कन्नड ची जागा भाजपने जिंकली असून त्यात काँग्रेसच्या मार्गारेट अल्वा विजयी झाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते