खानापूर

गुंजी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

खानापूर: जून्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि अनमोल ठेवा म्हणून तब्बल 40 वर्षांनंतर माडीगुंजी शाळेच्या इयत्ता सातवीच्या वर्ग मित्र-मैत्रीनींचा स्नेहमेळावा उद्या रविवारी दि. 27/10/24 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित केला आहे.

जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सत्कार्याने बहुतांश वर्ग मित्र, आपल्या गावचे व शाळेचे नाव उज्वल करत समाधानी व यशस्वी झालेले दिसतात. अर्थात मित्र-मैत्रीनीनी परस्परांशी सलोखा, स्नेह व आपलेपणातून घनिष्ठ ऋणानुबंध तयार केले आहे, तेच निर्भेळ , निर्भिड व विश्वासाचे नाते सर्वांच्या जीवनाचे खरे औषध ठरले आहे. यासाठी तब्बल 40 वर्षांनंतर सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा गुंजी येथील सन 1984-85 सालाच्या इयत्ता सातवीच्या बॅचने “माजी विद्यार्थी स्नेह-मेळावा’ उद्या रविवारी शहिद भगतसिंग हॉल, गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली, बेळगाव येथे आयोजित केला आहे.

या स्नेहमेळाव्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ एस डी गोरल आणि ऑड सुधिर गावडे यांनी केले आहे.

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?