खानापूर

उद ग आई’च्या गजराने यल्लमा डोंगर दुमदुमला
माघी पौर्णिमा यात्रेसाठी तब्बल ८ लाख भाविकांची उपस्थिती

बेळगाव: कर्नाटक,महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांची आराध्य दैवता असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका देवीची माघी पौर्णिमा यात्रा आज मंगळवारी साजरी होत आहे. माघी पौर्णिमा यात्रेनिमित्त तब्बल ८ लाख भाविक डोंगरावर हजर झाले आहेत. आज मंगळवारी पहाटे मान्यवरांच्या उपस्थितीत देवीला अभिषेक,पूजा चर्चा करण्यात आली, आणि त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. आई उदो च्या गजरात लाखो भाविकांनी आज भंडाऱ्याची मुक्त उधळण करत श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले.

लाखोंच्या संख्येने भावीक यात्रेसाठी डोंगरावर दाखल झाले आहेत.उद ग आई,उद च्या गजराने सौंदत्ती डोंगर दुमदुमून गेला आहे. भंडार्याची मुक्त उधळन केली जात आहे. भाविकांच्या उदंड उत्साहात सौंदत्ती रेणुका देवीची माघी पौर्णिमा यात्रा यंदा मोठा भव्य प्रमाणात साजरी होत आहे.
यावर्षीची यात्रेसाठी बेळगाव जिल्हा सह उत्तर कर्नाटक गोवा महाराष्ट्र येथील,प्रत्येक गावातून भाविकांसह, खासगी वाहने, परिवहन महामंडळाच्या बसेस, ट्रॅक्टर, बैलगाड्या इतर खासगी वाहने डोंगरावर आली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर प्रचंड संख्येने आलेले भाविक पाहता आवश्यक त्या सुविधाही अपुरे पडलेल्या दिसून येत आहेत.देवी दर्शनाला भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जोगनभाव परिसरातही पवित्र स्नानासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?