खानापूर

सायबर गुन्हेगारी- डिजिटल अरेस्ट रोखण्यासाठी नागरिकांना पोलिसांचे मार्गदर्शन

रामनगर: कृष्णा स्पोर्ट्स क्लब आणि रामनगर पोलीस स्थानक यांच्या संयुक्त विद्यमाने येथे वाहतूक नियम आणि सायबर क्राईम डिजिटल अरेष्ट विषयावर मार्गदर्शन उपक्रम आयोजित करण्यात आला.

या वेळी पोलीस उपनिरीक्षक बसवराज मबनूर यांनी ग्रामस्थ आणि युवकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून दिले. रामनगर पोलीस स्थानक हद्दीत 50 पेक्षा अधिक ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, नागरिकांनी वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.

सायबर क्राईमबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, वाढत्या गुन्हेगारीमुळे गरिबांवर आर्थिक फटका बसत आहे. डिजिटल अरेस्ट खोटे पोलिस असल्याने  सांगून फोनवरून पैसे मागन्याचे प्रकार घडत आहेत. अनोळखी व्यक्तीला ओटीपी देणे, आधार कार्ड किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती विचारल्यास ती देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

“हेल्मेट घेताना चांगल्या दर्जाचे घ्या, कारण सुरक्षा महत्त्वाची आहे. मोबाईलसाठी हजारो रुपये खर्च करतो, तिथे हेल्मेटसाठी का नाही?” असा विचारही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक व युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

डिजिटल अरेस्ट प्रकार काय आहे? dogital arrest

Digital Arrest: एक व्हिडीओ कॉल किंवा ईमेल तुमचे बँक खाते रिकामे करू शकते. कारण पोलीस, ईडी, सीबीआय अधिकारी म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने गंडवले जाते की तुम्हाला ते खोट आहे, हे तुम्हाला कळतही नाही.

आधी कॉल करतात आणि तुमचं आधार कार्ड कोणीतरी चुकीच्या कामासाठी वापरत आहे. तुम्हाला अरेस्ट होणार असे सांगून पैसे मागितले जातात. यात अनेक गरीब, उद्योजक, प्रसिद्ध व्यक्ती फसले आहेत. त्यांच्याकडून या सायबर ठगांनी कोट्यवधी रुपये उकळले आहेत.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते