खानापूर
गर्लगुंजीच्या पूर्वा पाटीलचे यश : बेळगांव ठळकवाडी हायस्कूलमध्ये प्रथम
गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील रिटायर्ड मुख्याध्यापक आर. एम. पाटील यांची नात आणि सदानंद राजाराम पाटील यांची सुकन्या, पूर्वा सदानंद पाटील हिने ठळकवाडी हायस्कूल, बेळगांव येथे 593 गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

पूर्वाच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात तिचं कौतुक होत आहे. अभ्यासातील सातत्य, आत्मविश्वास आणि पालकांचा पाठिंबा यामुळेच पूर्वाला हे यश मिळालं आहे, असं मत शाळेच्या शिक्षकांनी व्यक्त केलं आहे.