खानापूर
खानापूर तालुक्यातील या गावांमध्ये उद्या वीजपुरवठा बंद
खानापूर: रविवारी, 6 एप्रिल रोजी दुरुस्तीच्या कामानिमित्त खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती हेस्कॉमने दिली आहे.
सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मच्छे उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा होणाऱ्या खानापूर तालुक्यातील वसवडे, कुसमळ्ळी, बैलूर, मोरब, ओलमणी, वडगाव, दारोळी, चापोली, दापोली, देवाचीहट्टी, तोराळी, बेटगेरी, तळेवाडी या गावांसह परिसरातील इतर भागांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.