पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या बसचा अपघात, 5 भाविकांचा मृत्यू
पंढरपूरकडे जाणारी ट्रॅव्हल्स बस पाठीमागून ट्रॅक्टरला धडकून दरीत कोसळली. या बसमध्ये 54 प्रवासी होते. या दुर्घटनेत पाच भाविकांचा मृत्यू झाला. ते डोंबिवलीहून पंढरपूरला यात्रेसाठी जात होते. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मुंबई-पुणे महामार्गावर सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला.
ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळच्या वेळी ट्रॅक्टर दिसला नसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस 20 फूट खाली दरीत कोसळली. नवी मुंबईचे डीसीपी विवेक पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर सोमवारी रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. आषाढी एकादशीनिमित्त खासगी बसने 54 जण पंढरपूरला जात होते. प्रवाशांनी भरलेल्या या बसने ट्रॅक्टरला धडक दिली. त्यानंतर बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 42 जणांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भाविकांनी भरलेली बस डोंबिवलीतील केळझर गावातून पंढरपूरला जात होती. मुंबई एक्स्प्रेस हायवेजवळ या बसने एका ट्रॅक्टरला धडक दिली. त्यावेळी घटनास्थळी चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आणखी एका जणाचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यासाठी विठ्ठरुयाचे दर्शन घेण्यासाठी भाविक जात होते. परंतु काळाने 5 प्रवाशांना दर्शन घेऊ दिले नाही. आषाढी एकादशीला राज्यभरातून वारकरी दिंडीद्वारे पंढरपूरला जात असतात. ज्यांना दिंडीने जाणे शक्य होत नाही, ते भाविक बस आणि रेल्वेने पंढरपूर गाठतात. लाखोंची गर्दी आषाढीला पंढरपूरला होत असते.
Pandharpur-bound pilgrims bus accident, 5 devotees killed
The Pandharpur-bound travel bus collided with a tractor from behind and fell into the valley. There were 54 passengers in this bus. Five devotees died in this accident. He was going to Pandharpur from Dombivli for a pilgrimage. Five people have died and five are in critical condition. A terrible accident took place on Monday midnight on the Mumbai-Pune highway.
