खानापूर

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील केएलई बायपासजवळ गुरुवारी (दि. 17 एप्रिल) सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने सावगाव येथील एक 29 वर्षीय तरुण जागीच ठार झाला.

शुभम लक्ष्मण घुग्रेटकर (वय 29, रा. कलमेश्वर गल्ली, सावगाव) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम हा काकतीजवळील एका टायर कंपनीत काम करत होता. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे मोटारसायकलवरून कामावर जात असताना, केएलई बायपासजवळ अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत शुभमचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, तो दररोज बॉक्साईट रोडने जात असे, मात्र अपघाताच्या दिवशी त्याने महामार्गाचा मार्ग निवडला होता.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत तोटगी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या घटनेची नोंद वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात झाली आहे.

शुभम हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघातामुळे सावगावमध्ये शोककळा पसरली आहे.

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?