खानापूर

मोलेम जवळ दुचाकीची ट्रकला धडक; कर्नाटकातील दोन तरुणांचा मृत्यू

अनमोड: आज सकाळी अंदाजे साडेसहाच्या सुमारास, मोलेम नांदरेन जवळ एक दुचाकी आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. ही दुचाकी कर्नाटक दिशेने येत होती. दरम्यान, रस्त्याच्या कडेला चुकीच्या पद्धतीने उभी असलेली ट्रक थांबलेली होती. ट्रक लक्षात न आल्याने R1 दुचाकीस्वार   थेट ट्रकवर जाऊन आदळले.

या अपघातात दुचाकीवरील दोघं युवक  जोयडा तालुक्यातील अखेती पंचायत क्षेत्रातील मेडा येथील राजेश देसाई वय 25 हा जागी ठार झाला असून हल्ल्याळ येथील निखिल मडीवाळ वय 24 याला जखमी अवस्थेत उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

हे दोघंही युनिकॉम कंपनीत कामाला होते. आज सकाळी ते आधार कार्डशी संबंधित कामासाठी कर्नाटकात येत होते.

धारबांदोडा पीएससी पोलीस स्टेशनकडून दोघांचाही मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच संबंधित ट्रकचालकाविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते