आरोग्य

खानापूरच्या जखमी युवकाला मदतीची गरज

खानापूर: केंचापूर गल्ली खानापूर येथील तरुण कु. तुकाराम लक्ष्मण गवाळकर (वय 18) मूळ गाव मुघवडे यांच्या डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर गेल्या आठ दिवसांपासून बेळगावच्या केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्याच्या डोक्याचे ऑपरेशन करण्यात आले आहे. अजून बरेच दिवस उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागणार आहे.त्यामुळे तो जीवन मरणाशी झगडत आहे. वडील गवंडी असल्याने हा मोठा खर्च उचलताना त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना मदतीची गरज आहे.

त्यासाठी सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते तसेच दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन त्यांच्या कुटुंबियांनी केले आहे.

ज्याना मदत करायची आहे. त्यांच्यासाठी खालील संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत !!

राहुल गवाळकर – गुगल पे साठी 8147418981 व संपर्कासाठी 7975656151, मोबाईल क्रमांक व स्कॅनर देण्यात आला आहे.

अधिक मदतीसाठी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?