नंदगड येथे भव्य ज्ञानयज्ञ किर्तन सोहळ्याचे आयोजन

खानापूर: तालुक्यातील नदगड येथे युवा वारकरी संघटनेच्या वतीने सोमवार, 30 डिसेंबर 2024 रोजी भव्य ज्ञानयज्ञ गजर व किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता पूजा व पंचपदी आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, पाहुण्यांचे स्वागत व संक्षिप्त भाषणांनंतर मुख्य किर्तन सेवा सकाळी 11 वाजता सुरू होईल. या सोहळ्यात खानापूर तालुक्यातील विविध किर्तनकार आपली सेवा सादर करतील. ह. भ. प. म्हातू वांद्रे (11 ते 12), ह. भ. प. विठोबा सावंत, निलावडा (12 ते 1), ह. भ. प. तुकाराम ताबिटकर, गदोळी (1 ते 2), गुरु भक्त मारुती महाराज, नदगड (2 ते 3), ह. भ. प. श्रीकांत पाळेकर, बिडी (3 ते 4), ह. भ. प. मष्णू जोशीलकर, कामतगा यांचा हरिपाठ (4 ते 5) आणि ह. भ. प. नंदकुमार पाटील सर, किरहलशी यांचे प्रवचन (5 ते 6) होणार आहे. रात्री 8 ते 10 या वेळेत ह. भ. प. विठ्ठल पाटील महाराज, किरहलशी यांचे किर्तन सादर होईल.

कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा उद्देश तरुण पिढीला व्यसनमुक्त करून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अध्यात्मिकतेकडे वळवणे, तसेच कीर्तनकार, गायक व वादक तयार करून वारकरी परंपरेचा प्रचार व प्रसार करणे हा आहे. सर्व वारकरी संप्रदाय व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

