क्राईम

मृतदेह कारमधे सोडून फरार; व्यक्तीची हत्या…

बेळगांव : अथणी येथील एकाची विजापुर जिल्हा रुग्णालयाच्या आवारात कारमध्ये हत्या करून फरार झाल्याची घटना घडली आहे.

संगप्पा रामू देवकथा (वय 58, रा. कोहळ्ळी, ता. अथणी, जि. बेळगाव) असे मृताचे नाव आहे.

संगप्पा यांचा अज्ञातांनी खून करून त्याचा मृतदेह महाराष्ट्र पासिंग डस्टर कारमध्ये सोडून जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून पळ काढला आहे.

संगप्पा यांचा मृत्यू हा अनैसर्गिक मृत्यू असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. सांगप्पा यांचा मुलगा सचिन याने वडिलांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला.

संगप्पा यांनी एकाकडून एक लाख कर्ज घेतले होते. याच कारणावरून शनिवारी रात्री आठच्या सुमारास एकाने माझ्या वडिलांसह इतर चौघांचे अपहरण केले. त्यानेच हा खून केल्याचा आरोप केला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते