मैत्रीण मी पुढाऱ्याची…
मोहिशेत: सालाबादप्रमाणे यंदाही श्री पिसेपाईक देवस्थानाचा वार्षिक महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. सोमवार, 24 मार्च 2025 रोजी मोहिशेतसह दुधवाळ, हणबरवाडा, वरकड, पाट्ये, वाटरे आणि परिसरातील भाविक या सोहळ्यासाठी एकत्र येणार आहेत.

या महोत्सवात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता मोहिशेत व परिसरातील भक्तांचे सामूहिक भजन होणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता श्रींचा अभिषेक होईल आणि श्री. रवी जोशी लोंढा यांच्या मंत्रपठणाने श्री सत्यनारायण महापूजा संपन्न होईल.
भाविकांसाठी सायंकाळी 5 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत तिर्थप्रसाद व महाप्रसाद दिला जाणार आहे. त्यानंतर रात्री 9 वाजता प्रमुख पाहुण्यांचा सत्कार व श्रीफळांचा सवाल होईल. कार्यक्रमाच्या शेवटी, रात्री 10.30 वाजता सुप्रसिद्ध तीन अंकी विनोदी नाटक “मैत्रीण मी पुढाऱ्याची” सादर केले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. धनाजी पि. मिराशी, पुजारी, मोहिशेत असतील. तसेच या कार्यक्रमासाठी, श्री. पिरयोगी सिंगनाथजी महाराज, श्री शंकर गुंजेनाथ महाराज, आमदार श्री. विठ्ठल सोमाण्णा हलगेकर, माजी आमदार श्री. अरविंद चंद्रकांत पाटील, माजी जि. पं. सदस्य श्री. बाबुराव गो. देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.