खानापूर

खानापूर तालुक्याच्या विकासासाठी शंभर कोटींचे विशेष अनुदान जाहीर करा – आमदार विठ्ठलराव हलगेकर

बेळगाव: खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने शंभर कोटी रुपये विशेष अनुदान जाहीर करावे, अशी ठाम मागणी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी विधानसभेत केली. उत्तर कर्नाटक विकास विषयावर सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी तालुक्यातील समस्या आणि विकासाच्या गरजांवर प्रकाश टाकला.

आमदार हलगेकर म्हणाले की, “खानापूर तालुक्यातील जनता विविध समस्यांना सामोरे जात आहे. दुर्गम भागांतील गावकऱ्यांना अद्याप पाणी, वीज, आणि मोबाईल सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. दरवर्षी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा होते, परंतु सरकारकडून अद्यापही विशेष अनुदान मंजूर झालेले नाही.”

त्यांनी सरकारला मुख्यमंत्र्यांनी दिलेली वचनपूर्ती करण्याची आठवण करून दिली. तसेच, “खानापूरच्या अरण्यक्षेत्रातील रहिवाशांना प्रथम जागा उपलब्ध करून देण्यात यावी आणि त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करावे,” अशी मागणीही त्यांनी केली.

त्याचबरोबर, नंदगड आणि बिडी या गावांना नगरपंचायत दर्जा देण्याची गरज असल्याचेही आमदार हलगेकर यांनी विधानसभेत स्पष्ट केले. खानापूर तालुक्याच्या विकासासाठी विशेष लक्ष दिल्यास उत्तर कर्नाटकाच्या प्रगतीस चालना मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Kannada:
ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕು ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ 100 ಕೋಟಿ ರೂ. ಅನುದಾನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿರಿ – ಶಾಸಕರ ವಿಠ್ಠಲ ಹಳಗೇಕರ್ ಅವರ ಬೇಡಿಕೆ

ಬೆಳಗಾವಿ: ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಸಮಗ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಸರ್ಕಾರವು 100 ಕೋಟಿ ರೂ. ವಿಶೇಷ ಅನುದಾನವನ್ನು ಘೋಷಿಸಬೇಕು ಎಂದು ಖಾನಾಪುರದ ಶಾಸಕರಾದ ವಿಠ್ಠಲ ಹಳಗೇಕರ್ ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಬೇಡಿಕೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಚರ್ಚೆ ವೇಳೆ ಅವರು ಈ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಮುಂದಿಟ್ಟಿದ್ದರು.

“ತಾಲೂಕಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ನೀರು, ವಿದ್ಯುತ್, ಮತ್ತು ಮೊಬೈಲ್ ಸೇವೆಗಳಿಂದ fortfarande ವಂಚಿತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಪ್ರತೀ ವರ್ಷ ಭಾರಿ ಮಳೆಯ ಪರಿಣಾಮದಿಂದ ರಸ್ತೆಗಳಿಗೆ ಹಾನಿಯಾಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಘೋಷಿಸಿದಂತೆ ವಿಶೇಷ ಅನುದಾನವನ್ನು ತಕ್ಷಣ ಮಂಜೂರು ಮಾಡಬೇಕು,” ಎಂದು ಹಳಗೇಕರ್ ಅವರು ಆಗ್ರಹಿಸಿದರು.

ಅದೇ ರೀತಿ, ಅರಣ್ಯ ಪ್ರದೇಶದ ಜನರನ್ನು ಮೊದಲಿಗೆ ಕಾನೂನುಬದ್ಧವಾಗಿ ಸ್ಥಳಾಂತರಿಸಲು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಮತ್ತು ನಂದಗಡ ಹಾಗೂ ಬೀಡಿ ಗ್ರಾಮಗಳಿಗೆ ಪುರಸಭೆ ಸ್ಥಾನಮಾನ ನೀಡಬೇಕೆಂದು ಅವರು ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಒತ್ತಾಯಿಸಿದರು.


English:
Allocate ₹100 Crore for Khanapur Taluk Development – MLA Vitthal Halagekar

Belagavi: Khanapur MLA Vitthal Halagekar demanded in the Assembly that the government allocate ₹100 crore in special grants for the comprehensive development of Khanapur Taluk. He raised this demand during a discussion on North Karnataka’s development.

“Residents in remote villages of the taluk continue to lack access to basic necessities like water, electricity, and mobile services. Every year, heavy rainfall damages the roads. The special grant promised by the Chief Minister must be sanctioned immediately,” Halagekar emphasized.

He also urged the government to first provide legal settlements for forest dwellers and relocate them later. Additionally, he pressed for granting municipal council status to villages like Nandgad and Beedi.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते