खानापूर
लोढा रेल्वे स्थानकाजवळील तलावात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
रामनगर: लोढा रेल्वे स्थानकाजवळ गांधी नगर येथील तलावात मंगळवारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीचे अंदाजे वय ३५ ते ४० वर्षे असून, त्याने निळ्या रंगाची पॅंट आणि चेक्स निळी शर्ट घातली आहे.
त्याच्या गळ्यात त्रिशूल व धर्मिक क्रॉस आढळून आले असून, खिशात मिरजपर्यंतचे रेल्वे तिकीट सापडले आहे. मृत व्यक्तीविषयी कोणाला काही माहिती असल्यास, त्यांनी खानापूर पोलीस ठाणे किंवा लोढा पोलीसांशी 9480804033 संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.