खानापूर

खासदार कागेरी यांच्या घरात बिबट्याचा प्रवेश, सिसीटीव्हीत कैद

कारवार: उत्तर कन्नड जिल्ह्याचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी (Vishweshwar Hegde Kageri) यांच्या घरात अन्नाच्या शोधात आलेल्या बिबट्याने प्रवेश केल्याची घटना घडली आहे. या बिबट्याने खासदारांच्या घरातील कुत्र्याला पाठलाग केला, मात्र सुदैवाने कुत्रा बचावला.

ही घटना सोमवारी मध्यरात्री शिरसी तालुक्यातील कागेरी गावात घडली. त्यावेळी कागेरी आणि त्यांचे कुटुंबीय घरात आराम करत होते. घराबाहेर असलेला कुत्रा रात्री खूप भुंकत होता. त्यामुळे सकाळी घरातील लोकांनी विविध भागातील 3 सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बिबट्याच्या प्रवेशाची माहिती मिळाली.

या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून, त्यांनी घटनास्थळी येऊन तपास केला आहे. या भागात बिबट्याचा वावर सामान्य मानला जातो, परंतु अन्नाच्या शोधात तो गावाच्या आतील भागात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा प्रकार कागेरी गावात प्रथमच घडला असून, परिसरातील वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते