हुबळीहून कुंभमेळ्यासाठी विशेष ट्रेन! वेळापत्रक जाहीर
हुबळी: कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हुबळीहून दोन विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या ट्रेन तालुक्यातील लोंढा आणि खानापूर तसेच बेळगाव येथे थांबणार आहेत.hubali to prayagraj train
हुबळी-टुंडला स्थानकांदरम्यान विशेष ट्रेन सेवा:
ट्रेन क्र. 07379 – SSS हुबळी-टुंडला स्पेशल एक्स्प्रेस:
- प्रस्थान: SSS हुबळी स्थानकावरून 20 जानेवारी (सोमवार) रोजी 00:45 वाजता
- पोहोच: टुंडला, उत्तर प्रदेश येथे 22 जानेवारी (बुधवार) रोजी 02:30 वाजता
ट्रेन क्र. 07380 – टुंडला-SSS हुबळी स्पेशल एक्स्प्रेस:s
special train to prayagraj kumbmela
- प्रस्थान: टुंडला स्थानकावरून 23 जानेवारी (गुरुवार) रोजी 16:00 वाजता
- पोहोच: हुबळी स्थानकावर 25 जानेवारी (शनिवार) रोजी 18:40 वाजता
ट्रेन क्र. 07381 – SSS हुबळी-टुंडला स्पेशल एक्स्प्रेस:
- प्रस्थान: SSS हुबळी स्थानकावरून 6 फेब्रुवारी (गुरुवार) रोजी 20:10 वाजता
- पोहोच: टुंडला, उत्तर प्रदेश येथे 8 फेब्रुवारी (शनिवार) रोजी 20:15 वाजता
ट्रेन क्र. 07382 – टुंडला-SSS हुबळी स्पेशल एक्स्प्रेस:
- प्रस्थान: टुंडला स्थानकावरून 9 फेब्रुवारी (रविवार) रोजी 16:20 वाजता
- पोहोच: हुबळी स्थानकावर 11 फेब्रुवारी (मंगळवार) रोजी 18:40 वाजता
मार्गातील प्रमुख थांबे:
या गाड्या धारवाड, अळनावर, लोंढा, खानापूर, बेळगाव, गोकाक रोड, घटप्रभा, रायबाग, कुडाची, मिरज, सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज जंक्शन, फतेहपूर, गोविंदपुरी, इटावा या स्थानकांवर थांबणार आहेत.
डब्यांची रचना:
या गाड्यांमध्ये 1 एसी 2 टायर, 4 एसी 3 टायर, 11 स्लीपर क्लास, 1 सेकंड क्लास लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन, आणि 1 लगेज/जनरेटर/ब्रेक व्हॅन अशा 18 डबे असतील.
प्रवाशांसाठी सूचना:
प्रत्येक स्थानकावरील आगमन आणि सुटण्याच्या वेळा जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा हेल्पलाइन नंबर 139 वर संपर्क साधावा, असे दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मंजुनाथ कानडी यांनी सांगितले आहे.

Special train to kumbmela from hubali
train for kumbmela from Belgavi
Belgaum to prayagraj train
hubali to prayagraj train