बातम्या
कुंभार्डा-खानापूर बस कापोली पुलामुळे अडकली
खानापूर: तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुंभार्डा-खानापूर दरम्यानच्या कापोली पुलावर पाणी आल्याने बस दुसऱ्या बाजूला अडकली आहे.

काल संध्याकाळी कुंभार्डा गावात वस्तीसाठी गेलेली बस आज सकाळी 6.40 वाजता शाळेच्या मुलांना खानापूरला घेऊन येताना कापोली पुलावर पाणी आल्याने दुसऱ्या बाजूला अडकल्याने शाळेच्या मुलांचे नुकसान झाले आहे.
