खानापूर

खानापूर बँक निवडणूक: आज दोन पॅनलमध्ये टक्कर, कोण बाजी मारणार?

खानापूर: खानापूर सहकारी बँकेच्या १३ संचालकपदाच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज, १२ जानेवारीला होणार आहे. या निवडणुकीत १२ विद्यमान संचालकांसह २८ उमेदवार रिंगणात आहेत. बँकेचे १,९२१ सभासद उमेदवारांचे भविष्य ठरविणार आहेत.

निवडणुकीत विद्यमान संचालकांच्या सहकार पॅनलला विकास पॅनलने आव्हान दिले आहे. विद्यमान संचालक मारुती खानापुरी आणि शिवाजी पाटील यांनी स्वतंत्र “विकास पॅनल” उभे केले आहे. या पॅनलमधून सामान्य विभागात राजेंद्र चित्रगार, बाळाराम शेलार, दीपक डिगीकर, गंगाराम गुरव, संतोष हंजी, शांताराम निखलकर, सिताराम बेडरे; महिला विभागातून शोभा खानापुरी, रंजना पाटील; एससी विभागातून मारुती खानापुरी, एसटी विभागातून राजकुमार पाटील, अ वर्गासाठी कृष्णा कुंभार, ब वर्गासाठी शिवाजी पाटील हे उमेदवार आहेत.

तर विद्यमान संचालकांच्या सहकारी पॅनलमध्ये सामान्य विभागातून विद्यमान चेअरमन अमृत शेलार, परशराम गुरव, डॉ. सी. जी. पाटील, रवींद्र देसाई, रमेश नार्वेकर, मेघशाम घाडी यांच्यासह विठ्ठल गुरव यांचा समावेश आहे. महिला विभागातून अंजली कोडोळी, अंजूबाई गुरव, एससी विभागातून मारुती बिलावर, एसटी विभागातून अनिल बुरुड, अ वर्गातून विजय गुरव, ब वर्गातून मारुती पाटील हे उमेदवार आहेत.

याशिवाय सामान्य गटातून चंद्रकांत देसाई आणि परशराम करंबळकर हे स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

दोन्ही पॅनलांनी बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते, पण दोन्ही गटांनी माघार घेतली नाही, त्यामुळे निवडणूक होणार आहे. गेल्या आठवड्यात जोरदार प्रचार झाला असून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरावर निवडणुकीचा रंग चांगलाच चढला आहे.

निवडणुकीचे मतदान सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत जुन्या मोटर स्टॅण्ड रस्त्यावरील समर्थ इंग्लिश शाळेत होत आहे. मतदानानंतर मतमोजणी होईल.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते