खानापूर

खानापूर नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणूकीवर हायकोर्टाची स्थगिती

खानापूर: येत्या 26 तारखेला खानापूर नगरपंचायत च्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार होती. अध्यक्षपद व उपाध्यक्षपद ही दोन्ही जनरल महिलासांठी राखीव होती यासंदर्भात काँगेसचे कार्यकर्ता व नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी मा. उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.
आणि काल हायकोर्टाचा निकाल आला असून त्यामधे न्यायालयाने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूकीवर तात्पुरता स्थगिती आदेश दिला असून पुढील सुनावणी 29 ऑगस्ट रोजी होणार आहे. असे नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी सांगितले.

या आदेशाची प्रत श्री लक्ष्मण मादार यांनी आज तहसिलदार खानापूर यांचेकडे सुपुर्द केली आहे.  लक्ष्मण मादार पुढे म्हणाले की गेले कित्तेक वर्ष खानापूर नगरपंचायतच्या अध्यक्षपदासाठी एससी प्रवर्गाचे  राखीव आरक्षण आले नाही त्यामुळे आमच्या समाजावर अन्याय होतोय आणि हा अन्याय दूर व्हावा म्हणून मी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले.
आता आम्ही ही लढाई मा. कोर्टात जोमाने लढू असे ही लक्ष्मण मादार म्हणाले.

त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या मनात धाकधूक वाढली असून सध्यातरी या निवडणूकीचे भवितव्य मा. उच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असल्याचे दिसत आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते