खानापूर म. ए. समितीच्या वतीने आदर्श शिक्षक व आदर्श शाळांचा सत्कार
खानापूर: तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शिवस्मारक येथे तालुक्यातील आदर्श शिक्षक व आदर्श शाळांचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते . उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक समितीचे सचिव आबासाहेब दळवी यांनी करून तालुक्यातील आदर्श शिक्षक व आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्याचा हेतू व समितीच्या कार्याबद्दल माहिती दिली.
यावेळी बोलताना माजी आमदार मनोहर किनेकर म्हणाले, खानापूर तालुक्यातील बहुभाषिक मराठी असलेल्या ठिकाणी आजही शाळा व्यवस्थित रित्या टिकून या ठिकाणी समाज घडवण्याचे काम करत आहेत त्यामुळे या भागातील अनेक शिक्षक आज आदर्श शिक्षक व आदर्श शाळा घडवण्यास पात्र ठरत आहेत. याचा सार्थ अभिमान वाटतो. म्हणाले, मातृभाषेतील शिक्षण हे जीवन घडविण्याचे काम करते यासाठी आपल्या मातृभाषेतील शिक्षणाकडे प्राधान्य असे विनंती ही त्यांनी यावेळी उपस्थिताना केले. आज लोकशाही दिन पण आज सीमा भागातील लोकांना लोकशाही पासून न्याय मिळतो का ? याचेही विचार आपण केला. आदर्श शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या नजरेत ही आदर्श राहिले पाहिजे. सेवानिवृत्तीनंतर आपल्या विद्यार्थ्याकडून तोच आदर्श कायम ठेवण्याच्या दृष्टीने कार्य करत रहावे असेही त्यांनी सांगितले. शेवटी आभार नंदगड विभागाचे समिती कार्याध्यक्ष रमेश धबाले यांनी मांडले. कार्यक्रमाला अनेक समितीचे कार्यकर्ते, आदर्श शिक्षकांचे कुटुंबीय शाळा चे सदस्य उपस्थित होते.
