खेळ

कर्नाटक राज्य हॉकी इंडिया झोन स्पर्धेसाठी खानापूरच्या खेळाडूंची निवड

ताराराणी हायस्कूल खानापूर

खानापूर: बेंगळूर येथे कर्नाटक राज्य हॉकी इंडिया झोन स्पर्धेसाठी बेळगावच्या सबज्युनिअर चार हॉकी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

बेंगळूर येथे कर्नाटक हॉकी संघटनातर्फे सबज्युनिअर महिलांसाठी निवड चाचणी ठेवण्यात आली होती. या निवड चाचणीत संपूर्ण कर्नाटकातून महिलांनी भाग घेतला होता. त्यामध्ये ताराराणी खानापूर शाळेच्या हॉकी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. मयुरी कंग्राळकर, साक्षी चौगुले, साक्षी पार्टील, श्रेया पाटील या चार खेळाडूंची निवड झाली आहे.

या खेळाडूंना तुकाराम पाटील, वाय. एफ. निलजकर, खानापूर तालुक्याचे हॉकी प्रशिक्षक माजी सैनिक गणपत गावडे, बेळगाव हॉकीचे चेअरमन गुळाप्पा होसमनी, सुधाकर चाळके, उत्तम शिंदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार

इंडिया साऊथ झोन हॉकी स्पर्धेसाठी निवड झालेल्या चार महिला खेळाडूंचा व हॉकी प्रशिक्षकांचा खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय कुबल, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सेक्रेटरी पंडित ओगले, श्री लक्ष्मी गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत महाजन, संजय मयेकर, भाऊ चव्हाण, पिंटू यळूरकर, सोमनाथ गावडे, बंटी बुवाजी, धनाजी देवलतकर, लक्ष्मण गावडे, शुभम कुंभार, बाबू मयेकर, आदी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते