खानापूर
खानापूर : बैलूर ग्राम पंचायत अध्यक्षांवर अविश्वास ठराव

खानापूर: तालुक्यातील बैलूर ग्राम पंचायतच्या अध्यक्ष रामलिंग ओमानी मोरे यांच्या विरोधात आज, 22 जानेवारी 2025 रोजी अविश्वास ठराव मांडण्यात आला. या ठरावामुळे विद्यमान अध्यक्षांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले.

सदर ठरावावर मतदान घेण्यात आले, ज्यामध्ये 16 सदस्यांपैकी 11 सदस्यांनी अध्यक्षांच्या विरोधात मतदान केले. तिघांनी अध्यक्षांच्या बाजूने मतदान केले, तर एक सदस्य अनुपस्थित होता. माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण बामणे यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाल्यामुळे त्यांची एक जागा रिक्त आहे.
बैठकीमध्ये कुसमळीचे सामाजिक कार्यकर्ते आनंत सावंत यांनी स्पष्ट केले की, “रामलिंग मोरे यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम केले नाही, ज्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव घालण्यात आला.”

