खानापूर

खानापूर: तळेवाडी गावात डीसींची बैठक, पुनर्वसनासाठी कागदपत्रांची पडताळणी

खानापूर: भीमगड अभयारण्यात राहणाऱ्या खानापूर तालुक्यातील तळेवाडी ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यासंदर्भात उपायुक्त मोहम्मद रोशन ( DC Mohammed Roshan) आज यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली.

भीमगड निसर्ग छावणी परिसरात शनिवारी अधिकारी व ग्रामस्थांची बैठक झाली. अभयारण्याबाहेर जाऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांचे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन उपायुक्त मोहम्मद रोशन यांनी यावेळी दिले.

अभयारण्यात राहणाऱ्या नागरिकांना रस्ते, पाणी, वीज आणि इतर मुलभूत सुविधा पुरविता येत नाहीत. त्यामुळे तळेवाडी गावातील नागरिकांनी स्वेच्छेने स्थलांतर करण्यास सहमती दर्शविल्यास तत्काळ सर्व प्रकारची मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना ग्रामस्थांनी सर्व कुटुंबांना पर्यायी जमीन व घरे उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.

त्यावर उत्तर देताना उपायुक्त मोहम्मद रोशन यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले.

शासनाकडून पुनर्वसनासाठी देण्यात येणाऱ्या निधीचा वापर सुलभ करण्यासाठी ग्रामस्थांकडे उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करून पुनर्वसन समितीचे उपायुक्त व सदस्य सचिवांच्या नावे संयुक्त खाते उघडण्याचे निर्देश त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

भीमाशंकर गुलेडा, डीसीएफ मारिया ख्रिस्तुराजा, एसीएफ सुनीता निंबर्गी, खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड, वन व महसूल विभागाचे अधिकारी व तळेवाडी गावातील नागरिक उपस्थित होते.

khanapur talewadi villege

khanapur taluka villeges relocation

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते