खानापूर

आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

खानापूर:  आज (शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर) खानापूर विधानसभा मतदारसंघातील 4 कोटी 13 लाखांच्या विविध कामांचा शुभारंभ आमदार श्री विठ्ठलराव हलगेकर यांनी केला. 

या विकास कामातून कणकुंबी ते चिगुळे या 2 किलोमीटर रस्त्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी कामाचा शुभारंभ करण्यात आला. पंचायत राज्य आणि निर्मल विभाग अंतर्गत पाणी निचरा योजनेतून 12 गावामध्ये घटक पाणी योजनेसाठी 2 कोटी 13 लाखाचा निधी अंतर्गत गोल्याळी येथे पाणी घटक योजनेसाठी मंजूर झालेल्या 10 लाख 19 हजाराच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यामध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी घटक योजना (एल डब्ल्यू एम) योजनेसाठी, गोल्याळी येथे 10.19 लाख, आमटे 11.00 लाख, कणकुंबी 9.00 लाख, पारवाड 9.26 लाख, नागुर्डा 8. 88 लाख, मोहिशेत 11.69 लाख, लोंढा 45.98 लाख, कापोली केजी 9.06 लाख, मोहिशेत 11.69 लाख, लोंढा 45.98 लाख, कापोली केजी 9.06 लाख, हलगा 10.39 लाख, घोटगाळी 8.92 लाख, बीजगर्णी 8.26 लाख, व इतर कामे धरून 4 कोटी 13 लाख 23 हजार रुपयांच्या विकासात्मक कामांचा भूमिपूजन आमदार विठ्ठलराव हलगेकर च्या हस्ते शुक्रवारी दिवसभरात हाती घेण्यात आली.

यावेळी प्रत्येक भागातील नागरिक, भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते